For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Police Encounter बकरी ईदच्या दिवशी किशोरवयीन मुलाची हत्या केली अन् अखेर पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला

03:03 PM May 31, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
police encounter बकरी ईदच्या दिवशी किशोरवयीन मुलाची हत्या केली अन् अखेर पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला
Advertisement

उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एकजण ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे चकमकीत ठार झालेल्या व्यक्तीवर बकरी ईदच्या दिवशी एका किशोरवयीन मुलाची हत्या केल्याचा आरोप होता.

Advertisement

सविस्तर वृत्त असे, गाझियाबादच्या खोडा परिसरात १७ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी ५०,००० रुपयांचे बक्षीस असलेला एक मुख्य संशयित रविवारी पहाटे वसुंधराजवळ झालेल्या पोलीस चकमकीत ठार झाला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांशी चकमक

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की “रविवारी पहाटे, मुख्य संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि संशयित त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबत दुचाकीवर दिसला. पोलीस बॅरिकेड्स लावून तपासणी करत असताना ती दुचाकी दिसली. त्या दोघांना थांबण्यास सांगितले असता, त्यांनी ऐकले नाही आणि पोलिसांवर गोळीबारही केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात असद गोळी लागून जखमी झाला. त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला,” असे डीसीपी (शहर) धवल जयस्वाल यांनी सांगितले.

“त्याचे वय अंदाजे २० वर्षांच्या आसपास असावे,” असे डीसीपी म्हणाले. तथापि, पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की मुख्य संशयित अंदाजे १७ ते १८ वर्षांचा आहे, परंतु त्याला पकडल्यानंतरच त्याच्या वयाची पुष्टी केली जाईल. जखमी कॉन्स्टेबल आणि मुख्य संशयिताला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे संशयिताला मृत घोषित करण्यात आले.

किरकोळ वादावरुन खून

पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या असदने  बकरी इदच्या दिवशीच एका किशोरवयीन मुलाचा खून केला होता. त्या दिवशी १७ वर्षीय सुर्या चौहान हा मुलगा लोकप्रिया विहारमधील एका वस्तीतील रस्त्यावर गेला होता, जिथे मुख्य संशयित आणि त्याचे मित्र उपस्थित होते. त्या दोघांमध्ये मोटरसायकलवरून वाद झाला, त्यानंतर संशयित असदने चाकू काढून त्या १७ वर्षीय सूर्यावर वार केले आणि तो पळून गेला. स्थानिकांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुलाला तातडीने नोएडा येथील रुग्णालयात दाखल केले, जिथे शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement
Tags :

.