For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोंधळ घालणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

07:41 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोंधळ घालणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या काळ्या दिनाच्या निषेध फेरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न कन्नड दुराभिमानी संघटनांकडून करण्यात आला. फेरीकडे येत असल्याचे समजताच पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ही दरवर्षीची स्टंटबाजी असल्याने पोलिसांनीही त्यांना तितकेसे मनावर घेतले नाही.

सायकल फेरी शांततेच्या मार्गाने काढण्यात आली. कुठेही गोंधळ अथवा पोलीस प्रशासनाला त्रास न देता फेरी सुरू होती. परंतु याच दरम्यान एका कन्नड संघटनेचा म्होरक्या आपल्या पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन गोवावेसच्या दिशेने चाल करून येत होता. भाषिक वाद उफाळू नये यासाठी त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

केवळ कन्नड भाषिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी असे प्रकार केले जात असतात. पोलीस संरक्षणातच समितीच्या फेरीवर चाल करून येण्याचे दाखविले जाते. सरतेशेवटी पोलीस त्यांना ताब्यात घेऊन इतर ठिकाणी सोडतात. हे दरवर्षीचे असल्याने यावर्षी पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.