For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुथरा बंधूंच्या पोलिस कोठडीत 26 पर्यंत वाढ

02:49 PM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुथरा बंधूंच्या पोलिस कोठडीत 26 पर्यंत वाढ
Advertisement

पणजी : हडफडे येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या द बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंची  पोलिस कोठडी म्हापसा येथील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी 26 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. म्हापसा येथील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने लुथरा बंधूंना गेल्या बुधवारी पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशीसाठी ठेवण्याची परवानगी दिली होती. ही मुदत संपल्याने काल सोमवारी लुथरा बंधूंना पुन्हा न्यायालयासमोर आणण्यात आले. पोलिस कोठडी वाढवून मागताना तपास अधिकाऱ्याने युक्तिवाद केला की, या प्रकरणात नवीन तथ्ये समोर आली आहेत, ज्यात लुथरा बंधूंनी बर्च प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे बोगस तयार केली असावीत. मूळ कागदपत्रे हस्तगत करणे आवश्यक असल्याने किमान आठ दिवसांची मुदतवाढ मागितली.

Advertisement

गुप्ताला 14 दिवसांची कोठडी 

दरम्यान, बर्च रोमियो लेन नाईट क्लबचे सहमालक असलेला अजय गुप्ता याने पाठीचा त्रास असल्याचा दावा केल्याने न्यायालयाने त्याला फक्त गादी देण्याची मुभा दिली आहे. सोमवारी दुपारी अजय गुप्ता याच्या जामीन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी पोलिस तपास अधिकाऱ्याने आरोपींच्या जामीन अर्जांवर आपले म्हणणे सादर केले. यानंतर, न्यायालयाने अजय गुप्ताला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.