For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News | कराडच्या 'चावडी'वर पोलिसांचा अचानक छापा! त्या रात्री हुल्लडबाजांसोबत नेमकं काय घडलं?

12:02 PM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   कराडच्या  चावडी वर पोलिसांचा अचानक छापा  त्या रात्री हुल्लडबाजांसोबत नेमकं काय घडलं
Advertisement

                 चावडी चौक व कृष्णा घाट परिसरात हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई

Advertisement

कराड: येथील चावडी चौक वकृष्णा घाट परिसरात दुचाकीवरून हुल्लडबाजी, रेसड्राईव्हींग करणाऱ्या सडकसख्याहरींवर शहर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे ५० दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करत दंड आकारला. यामुळे कराडात दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही तरुणांकडून दुचाकींवरून रेस ड्राईव्ह, भरधाव वेगाने वाहन चालविणे, मोठमोठ्याने सायलेन्सरचा आबाज करणे तसेच हुल्लडबाजीचे प्रकार वाढले होते. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम व त्यांच्या टीमने विशेष मोहीम राबवत संबंधितांवर धडक कारवाई केली.

Advertisement

प्रीतिसंगम घाट परिसरात रात्री उशिरापर्यंत काही युवक दुचाकींबर स्टंटबाजी करत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत होते. काही जणांकडून सडक सख्याहरीच्या नावाखाली रेस ड्राय करून परिसरातील शांतता भंग केली जात होती. त्यामुळे नागरिक, पर्यटक तसेच कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलिसांनी शनिवारी अचानक नाकाबंदी व गस्त वाढवत संशयित दुचाकीस्वारांची तपासणी केली.

Advertisement
Tags :

.