For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | विश्वास नडला! १८ लाख रुपये बँक खात्यावर घेतले अन्...; अंगापूर-वंदनमधील धक्कादायक प्रकार समोर

03:18 PM Jun 14, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   विश्वास नडला  १८ लाख रुपये बँक खात्यावर घेतले अन्     अंगापूर वंदनमधील धक्कादायक प्रकार समोर
Advertisement

Advertisement

सातारा -प्लॉट खरेदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,अंगापूर-वंदन (जि. सातारा) येथील पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप भुजबळ (बक्कल क्रमांक २६७७, नेमणूक पोलीस मुख्यालय सातारा), याने फिर्यादी मयूर हनुमंत कणसे(वय ३२, रा. अंगापूर-वंदन, ता. जि. सातारा) यांना प्लॉट खरेदी करून त्यातून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

Advertisement

फिर्यादीने विश्वास ठेवून आपल्या एसबीआय बँकेच्या खात्यातून आरोपीच्या खात्यावर ऑनलाईन व्यवहाराद्वारे १८ लाख रुपये जमा केले. मात्र, संबंधित प्लॉटची खरेदी न करता तसेच घेतलेली रक्कम परत न देता आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना ७नोव्हेंबर २०२४ ते १२ जून २०२६ या कालावधीत अंगापूर-वंदन येथे घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.