For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | 1400 किलो गोमांस, एका बोळातील कोंडवाडा आणि ३७ मुकी जनावरं...; मिरजेतील 'त्या' बेकायदेशीर कत्तलखान्यामागचं काळं सत्य!

03:31 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   1400 किलो गोमांस  एका बोळातील कोंडवाडा आणि ३७ मुकी जनावरं     मिरजेतील  त्या  बेकायदेशीर कत्तलखान्यामागचं काळं सत्य
Advertisement

Advertisement

मिरज : शहरातील मोमीन गल्ली,बोकुड चौक येथे सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यावर बुधवारी मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १४०० किलो गोमांस जप्त केले.

कत्तलीसाठी ट्रकमधून आणलेल्या पाच मोठ्या गायी व ३२ वासरे अशा एकूण ३७ जनावरांची सुटका करण्यात आली. टेंपोसह पाच लाख, दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयीत अजीज बेपारी, सलमान हारुण बेपारी, सुरज कबीर सय्यद व लाल्या (पूर्ण नांव नाही) अशा चौघांवर गोहत्या प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीव चौघुगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

याबाबत माहिती अशी, मोमीन गल्ली येथे एका बोळात असलेल्या पत्रावजा शेडमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षा समिती व श्री शिवछत्रपती गोरक्षा समितीला मिळाली होती.समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. बुधवारी सदर कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणली जाणार असल्याची कुणकुण लागल्याने मिरज शहर पोलिसांनी तेथे छापा टाकला. सदर कारवाईनंतर कत्तलखाना चालकासह तेथील कर्मचारी पळून गेले.

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सदर कत्तलखान्यात सुमारे १४०० किलोचे मांस मिळून आले. सदरचे मांस हे गोवंश जनावरांचे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कत्तलखान्याच्या बाहेर असलेल्या टेंपोत व बोळातील कोंडवाड्यात पाच गायींसह ३७गोवंश वासरे अशी एकूण ३७जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले. सदर सर्व जनावरे कत्तलीसाठी आणल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी जनावरांची सुटका केली. तसेच वाहतुकीसाठी वापरलेला एक टेंपोही जप्त करण्यात आला आहे. सदर ठिकाणी सापडलेले गोमांसही जप्त करुन त्याचे नमुने तपासणीसाठीप्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, सदर बेकायदेशीर कत्तलखाना चालविणाऱ्या संशयीतांची नांवेही पोलिसांनी निष्पन्न केली असून, संशयीत अजीज बेपारी, सलमान हारुण बेपारी, सुरज कबीर सय्यद व लाल्या अशा चौघांवर गोहत्या प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या छापेमारीनंतर संशयीत पळून गेले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.