For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा वडगावात पाहणी दौरा

06:22 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा वडगावात पाहणी दौरा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

वडगाव येथील श्री मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सोमवारी सायंकाळी वडगाव परिसराला भेट देऊन तयारीची पाहणी केली. यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Advertisement

पोलीस आयुक्तांसमवेत वाहतूक विभागाचे एसीपी जे. आर. निकम, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसराबरोबरच यात्रोत्सव ज्या परिसरात भरतो त्या परिसराला भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

Advertisement
Tags :

.