महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवजयंती मंडळ पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन

10:22 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव येथे होणारा पारंपरिक शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरील आवाहन केले आहे. बुधवारी मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली होती. त्यानंतर लगेच गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात शिवजयंती उत्सव मंडळ व चित्ररथ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मिरवणूक मार्गाबरोबरच मिरवणुकीच्या काळात घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही समस्या मांडल्या. उत्सव व मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पोलीस दलाला सल्ला दिला. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदींसह शहरातील एसीपी व पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, सुनील जाधव, अंकुश केसरकर यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व शहरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खडेबाजार एसीपी कार्यालय व शहापूर पोलीस स्थानकातही शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article