For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस आयुक्तांची हुबळी-धारवाडला बदली

08:14 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलीस आयुक्तांची हुबळी धारवाडला बदली
Advertisement

प्रकाश निकम बेळगावचे नवे पोलीस आयुक्त

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची बदली झाली असून हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी 2012 बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम यांची नियुक्ती झाली आहे.

Advertisement

शनिवारी 29 ऑगस्ट रोजी सरकारने 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये बेळगाव पोलीस आयुक्तांचाही समावेश आहे. गेल्या पंधरवड्यापासून आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे त्यांची बदली होणार नाही, अशी अपेक्षा होती. गणेशोत्सवाआधीच बेळगावातून त्यांची बदली करण्यात आली आहे.

भूषण गुलाबराव बोरसे यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. खासकरून नशामुक्त बेळगावसाठी त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. मटका, जुगार आदी अपप्रवृत्ती फोफावू नयेत यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांना आळा घालण्यासाठी लॉक्ड हाऊस बिट सिस्टीम सुरू केली होती.

स्वच्छ चारित्र्याचे प्रामाणिक अधिकारी म्हणून भूषण गुलाबराव बोरसे यांची ओळख आहे. नागरिकांच्या समस्या संयमाने ऐकून त्या दूर करण्यासाठी त्यांची धडपड असायची. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठीही त्यांनी प्राधान्यक्रमाने काम केले होते. मात्र, भ्रष्टाचारात बुडालेल्या मटका, जुगाऱ्यांच्या पाठीशी राहणाऱ्या काही अधिकाऱ्यांची त्यांना पूर्णपणे साथ मिळाली नाही. पोलीस आयुक्तांनी गैरधंदे थोपविण्याची सूचना देऊनही ग्रामीण भागातील काही अधिकाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मटका, जुगारी अ•s सुरू ठेवले होते. लाचखोर अधिकाऱ्यांना सरळ करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच होता. अशावेळी हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाली आहे.

Advertisement
Tags :

.