For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

06:22 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
Advertisement

पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Advertisement

► वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमादरम्यान कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील कॅथेड्रल रोडवर हा कार्यक्रम झाला. उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा कार्यक्रम अधिक काळ सुरू राहिल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. हॅस्टिंग्स पोलीस ठाण्यात शनिवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अपू वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम 61(2), 223, 125(ए), 132 आणि 285 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांच्या तक्रारीनुसार, उच्च न्यायालयाने कॅथेड्रल रोडच्या एका बाजूला स्थापना दिनाचा कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरही गर्दी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तक्रारीत ममता बॅनर्जी यांच्यासह आयोजकांनी कथितरित्या ‘फौजदारी कट’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान जमावाला चिथावणी देण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्स बाजूला सारत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट केल्याने परिस्थिती गोंधळाची झाली, असा दावा तक्रारीत आहे.

Advertisement
Tags :

.