For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हर्स्टेपनला पोल पोझिशन

06:32 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हर्स्टेपनला पोल पोझिशन
Advertisement

वृत्तसंस्था/ शांघाय

Advertisement

रविवारी येथे होणाऱ्या चायनीज ग्रा प्रि एफ-1 मोटार शर्यतीसाठी शनिवारी रेडबूल चालक मॅक्स व्हर्स्टेपनने पोल पोझिशन पटकावले. शनिवारी झालेल्या सरावाच्या सत्रामध्ये व्हर्स्टेपन आणि त्याचा साथीदार सर्जिओ पेरेस यांनी 1 मिनिट 33.660 सेकंदाची जलद वेळ नोंदवली.

रविवारी होणाऱ्या या शर्यतीमध्ये आता व्हर्स्टेपन व पेरेस हे पहिल्या रांगेत राहतील. तसेच फर्नांडो अलोन्सो तसेच मॅक्लेरिन चालक नोरीस हे दुसऱ्या रांगेत राहतील. व्हर्स्टेपन यापूर्वी तीनवेळा चायनीज ग्रा प्रि मोटार शर्यत जिंकली आहे. हॉलंडचा चालक व्हर्स्टेपनने आतापर्यंत ग्रा प्रि मोटार शर्यत क्षेत्रामध्ये 22 अजिंक्यपदे मिळवली आहेत. 2024 च्या मोटार रेसिंग शर्यतीमध्ये व्हर्स्टेपनने 4 पैकी 3 शर्यती जिंकल्या आहेत तर ऑस्ट्रेलिय ग्रा प्रि शर्यतीमध्ये त्याला विजेतेपद मिळवता आले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.