For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलंडची इगा स्वायटेक विजेती

06:48 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलंडची इगा स्वायटेक विजेती
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद

Advertisement

एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 22 वर्षीय स्वायटेकने आर्यना सबालेंकाचा तीन सेट्समधील लढतीत पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत सबालेंकाने अंतिम सामन्यात स्वायटेकचा पराभव करुन जेतेपद मिळविले होते. पण यावेळी स्वायटेकने आपल्या मागील पराभवाची परतफेड केली. 2024 च्या टेनिस हंगामात स्वायटेकचे हे तिसरे विजेतेपद आहे. स्वायटेक ही आता आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत डब्ल्यूटीए टूरवरील 20 स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी म्हणजे 2012 साली कॅरोलिन वोझनियाकीने असा पराक्रम केला होता. माद्रिद टेनिस स्पर्धेतील स्वायटेक आणि साबालेंका यांच्यातील हा अंतिम सामना 3 तास 11 मिनिटे चालला होता. साबालेंकाने यापूर्वी दोन वेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.