महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पीओके आमचं नाही : पाकिस्तान

06:58 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्लामाबाद न्यायालयात दिली कबुली : विदेशी भूमीवर सैनिक तैनात का केले?

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेवरून स्वत:च्याच दाव्याचा फोलपणा उघड केला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात पाकिस्तानच्या एका सरकारी वकिलाने पीओकेवरून एक दावा केला आहे. पीओके हा पाकिस्तानचा भूभाग नसल्याचा दावा तेथील सरकारी वकिलाने न्यायालयात केला आहे. तर पीओके आमचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने नेहमीच ठणकावून सांगितले आहे.

फेडरल प्रॉसिक्यूटर जनरल (सरकारी वकील) हे इस्लामाबाद येथून अपहरण करण्यात आलेले कवी अहमद फरहाद शाह यांच्याप्रकरणी सरकारचा बचाव करत होते, तेव्हा त्यांनी फरहाद हे 2 जूनपर्यंत पीओकेत कोठडीत राहतील असे सांगितले आहे. फरहाद यांना इस्लामाबाद न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकत नाही, कारण पीओके हे आमचे नव्हे तर एक विदेशी क्षेत्र असल्याचे पाकिस्तानच्या सरकारी वकिलाने मान्य केले आहे.

उच्च न्यायालयाचा सवाल

सरकारी वकिलाच्या या दाव्यावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत पीओके जर एक विदेशी क्षेत्र असेल तर तेथे पाकिस्तानी रेंजर्स पाकिस्तानातून कसे पोहोचले असा सवाल उपस्थित केला. तर सरकारी वकिलाच्या या दाव्यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी वकिलाचा हा दावा न्यायिक प्रणाली आणि पीओकेच्या स्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पीओके जर आमचे नसेल तर पाकिस्तानला एका विदेशी क्षेत्रात सैनिक तैनात करण्याचा आणि प्रशासनाचा अधिकार कसा मिळाला असा प्रश्न या पत्रकाराने उपस्थित केला आहे.

आयएसआयकडून अपहरण

पाकव्याप्त काश्मीरमधील कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह हे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी गायब झाले होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली असता ते पोलीस कोठडीत असल्याचे समोर आले. यानंतर शाह यांच्या कुटुंबीयांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवारी तेथे सुनावणी झाली. याच सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाने पीओके हा पाकिस्तानचा भूभाग नसून विदेशी क्षेत्र असल्याचा युक्तिवाद केला. पीओकेतील सर्वसामान्यांचा आवाज ठरलेले आणि पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराच्या विरोधात लढा देणारे कवी अहमद फरहाद हे 14 मे रोजी इस्लामाबाद येथून बेपत्ता झाले होते. सैन्यावर टीका केल्याने फरहाद यांना आयएसआयने गायब करविल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

पीओके भारताचा अविभाज्य भाग

पीओकेप्रकरणी भारताने स्वत:ची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. हा भारताचा हिस्सा होता आणि नेहमी भारताचाच हिस्सा राहणार असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी गुरुवारीच स्पष्ट केले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article