महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोग्बाची फुटबॉल कारकीर्द धोक्यात

06:41 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जिनिव्हा

Advertisement

2018 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघातील हुकमी आणि अव्वल फुटबॉलपटू पॉल पोग्बा याची फुटबॉल कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुटबॉल क्षेत्रातील पोग्बा हा सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो.

Advertisement

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने पोग्बावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरुद्ध पोग्बा कायदेशीर दाद मागण्यासाठी झगडत आहे. 2022 च्या विश्वकरंडक तसेच त्यानंतरच्या युफा फुटबॉल स्पर्धेत उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या दोन फुटबॉलपटूंची प्रकरणे लॉसेनी येथील क्रीडालवादासमोर ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणांची सुनावणी नजिकच्या काळात होणार आहे. उत्तेजक चाचणीमध्ये टेनिस क्षेत्रातील ग्रँडस्लॅम विजेती सिमोना हॅलेप तसेच रशियाची स्केटिंगपटू कॅमिला व्हॅलेव्हा यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. 2015 पासून या प्रकरणांच्या बंदी कालावधीला प्रारंभ झाला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article