कवयित्री स्नेहा कदम यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम साहित्य पुरस्कार जाहीर
सम्यक साहित्य संसदेचा पुरस्कार
ओटवणे | प्रतिनिधी
सम्यक साहित्य संसदेचा राज्यस्तरीय सर्वोत्तम साहित्य पुरस्कार सावंतवाडी येथील कवयित्री स्नेहा कदम यांना जाहीर झाला आहे. युवा कवियित्री स्नेहा विठ्ठल कदमयांच्या" शिल्लक भीतीच्या गर्भकोषातुन" या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.सम्यक साहित्य संसद हि महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्य चळवळ असुन दरवर्षी एका परिवर्तन वादी कविच्या काव्यसंग्रहा़ची दिवंगत कवी उत्तम पवार यांच्या स्मरणार्थ सर्वोत्तम पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. हा साहित्य पुरस्कार या वर्षी सिंधुदुर्गातील युवा कवियित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या" शिल्लक भीतीच्या गर्भकोषातुन" या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. याआधी हा पुरस्कार ज्येष्ठ कवी अरुण इंगवले, भूषण रामटेके, डॉ. श्रीधर पवार, व प्रा.सिद्धार्थ तांबे यांना प्रदान केलेला आहे. स्नेहा कदम यांच्या शिल्लक भीतीच्या गर्भ कोशातून या काव्यसंग्रहाला यापुर्वी कवीवर्य पद्मश्री नारायण सुर्वे वाचानालयाचा विशेष काव्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परीषद पूणे यांचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कवियत्री स्नेहा कदम यांच्या साहित्य लेखनाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पॅंथर ज.वि पवार, ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार, ज्येष्ठ लेखिका आशालाता कांबळे, डॉ. श्रीधर पवार, कवी सुनील हेतकर आणि प्रसंवाद परिवार यांची सातत्याने प्रेरणा मिळाली आहे.