पोकोचा एम 8 एक्स लाँच
06:28 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
5 जी स्मार्टफोनची किंमत 21 हजार रुपये
Advertisement
वृत्तसंस्था/ कोलकाता
चांगल्या कॅमेऱ्यासह पोकोने आपला पोको एम 8 एक्स हा 5 जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची किमत 21 हजार रुपयाच्या घरात असणार आहे.
Advertisement
एम 8 अंतर्गत सादर झालेला हा फोन कंपनीचा तिसरा फोन आहे. सदरचा फोन 4 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येणार असून त्याची किमत 20999 रुपये इतकी असेल. 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला खरेदी करणाऱ्यांना 2 हजाराची सवलत मिळणार आहे.
विक्रीला कधी सुरुवात
भारतात या फोनची विक्री 27 ऑगस्ट रोजी 12 पासून फ्लीपकार्टवर सुरु होणार आहे. सदरचा फोन लेदर ग्रीन, ब्ल्यू व ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध होईल. 6.9 इंचाची एलसीडी डिस्प्ले स्क्रीन फोनला असून कॉर्निंग गोरीला ग्लास 7 आयचे संरक्षण याला असेल.
Advertisement