‘पोको सी85 एक्स’ लाँच
नवी दिल्ली :
शाओमीच्या सब-ब्रँड पोकोने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘पोको सी 85 एक्स’ सादर केला आहे. कंपनीच्या सी-सिरीजमधील हा नवा फोन आहे. या फोनमध्ये 6300 एमएएच क्षमतेची बॅटरी, 32एमपी कॅमेरा आणि 120 एचझेड रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. कंपनीचा दावा आहे, की ही बॅटरी दोन दिवसांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते. हा फोन विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन केला आहे ज्यांना कमी बजेटमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी आणि दीर्घ बॅटरी लाईफ हवी आहे.
किती असणार किंमत
सदरचा स्मार्टफोन हा भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. त्याच्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 10,999 आहे. 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 आहे. हा फोन काळा, सोनेरी आणि हिरव्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. कनेक्टिव्हिटीमध्ये यात 5 जीसह वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि ड्युअल सिम सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्यो आहेत.