For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला; राहूल गांधी यांच्याकडून राहूल पाटील यांचे सांत्वन 

06:40 PM May 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला  राहूल गांधी यांच्याकडून राहूल पाटील यांचे सांत्वन 
Rahul Gandhi consoled PN Patil
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी दिवंगत आमदार पी. एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांना नुकतेच सांत्वनपत्र पाठवले आहे. पी.एन. पाटील यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्यासारखा जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारा नेता काँग्रेस परिवाराने गमावला आहे. उपेक्षितांचे जीवन बदलण्याचा निर्धार त्यांच्या राजकारणाला दिशा देणारा ठरला आहे, अशा भावना काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांना पाठवलेल्या सांत्वनपत्रातून व्यक्त केल्या.

Advertisement

सांत्वन पत्रामध्ये म्हटले आहे कि, दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या काँग्रेस विचारधारेशी असलेल्या तीव्र बांधिलकीने त्यांच्या राजकारणाला आकार दिला. समाजात शांतता आणि सहिष्णुतेचा आदर्श साजरा करण्यासाठी त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ सद्भावना दौडचे आयोजन केले. पक्षासाठी विशेषत: कोल्हापुरातील संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान स्मरणात राहील. मी तुझ्या दु:खाची कल्पना करू शकतो. कृपया माझ्या मन:पूर्वक संवेदना स्वीकारा. या कठीण काळात माझे विचार आणि प्रार्थना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहेत असे पत्रात नमूद आहे.

Advertisement
Advertisement

.