आमदार पी एन पाटील यांना सहकार आदर्श नेतृत्व पुरस्कार जाहीर
७ जाने रोजी संगमनेर येथे होणार पुरस्कार वितरण
चुये प्रतिनिधी
करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांच्या सहकारातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा सहकारातील आदर्श नेतृत्व राज्यस्तरीय पुरस्कार आमदार पी एन पाटील यांना जाहीर झाला आहे . ७जानेवारी रोजी संगमनेर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा होणार आहे .
गेली 40 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आमदार पी एन पाटील यांनी विविध संस्था वरती नेतृत्व करीत सहकाराच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल योगदान दिलेलं आहे .शेतकरी हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी आपले शेतकरी नेतृत्व सिद्ध करून दाखवलेले आहे . कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सलग पाच वर्ष अध्यक्ष पद भूषवून शेतकरी हिताच्या अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत . जिल्हाबॅकेवर ते सलग चाळीस वर्षे प्रतिनिधीत्व करीत आहेत . त्यांनी श्रीपतराव दादा बँक , निवृती तालुका संघ, राजीवजी सहकारी सुतगिरण या संस्थाची उभारणी करून एक आदर्श सहकार निर्माण करीत शेतकरी हित जोपासले आहे . साखरउद्योग अडचणीत असताना सुद्धा भोगावती साखर कारखाना चेअरमन म्हणून यशस्वी कारकिर्द पार पाडली आहे . जिल्हयाच्या सहकार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करीत सहकार नेतृत्व यशस्वी केले आहे याची दखल घेऊन संगमनेर जि अहमदनगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवा संस्थेने यंदाचा सहकारातील आदर्श नेतृत्व असा राज्य स्तरीय पुरस्कारासाठी आमदार पी .एन . पाटील यांची निवड केली आहे .
७ जाने रोजी संगमनेर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला कर्णाटकचे माजीमंत्री एच के पाटील तसेच विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे