For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत भाजपला पीएमकेची साथ

06:43 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत भाजपला पीएमकेची साथ
Advertisement

भाजपला मिळाला नवा सहकारी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगणारा भाजप दक्षिणेत स्वत:चा विस्तार करू पाहत आहे. यानुसार भाजपने तामिळनाडूत पीएमके म्हणजेच पट्टाली मक्कल काची पक्षासोबत आघाडी केली आहे. हा एक छोटा प्रादेशिक पक्ष असून राज्याचे याचे पाच आमदार आहेत. पक्षाध्यक्ष अंबुमणि रामदास यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामुळे प्रेरित झालो असून देशाच्या विकासात सहकार्य करण्यासाठी भाजपसोबत आघाडी केल्याचे म्हटले आहे.

Advertisement

तामिळनाडू विधानसभेत पीएमके चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या पक्षाला 3.8 टक्के मते मिळाली होती. भाजपने पीएमकेकरता लोकसभेच्या 10 जागा सोडल्या आहेत. राज्यात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनता आता द्रमुकला कंटाळली आहे. याचमुळे आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या आघाडीला केवळ तामिळनाडू नव्हे तर पूर्ण देशात मोठा विजय मिळणार आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे उद्गार रामदास यांनी काढले आहेत.

भाजप 29 जागा लढविणार

मागील 10 वर्षांपासून पीएमके रालोआचा हिस्सा राहिला आहे. परंतु आता आम्ही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे रामदास यांनी सांगितले आहे. पीएमके आणि भाजप यांच्यातील जागावाटप निश्चित झाले आहे. भाजप राज्यातील 39 पैकी 29 जागांवर उमेदवार उभा करणार आहे. या आघाडीमुळे भाजपला लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.