पंतप्रधान मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबरला महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात पोहोचणार आहेत. यादरम्यान ते राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर पंतप्रधान नौदल दिन 2023 सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सिंधुदुर्गातही जाणार आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाणार आहे. पीएमओकडून अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर रोजी दुपारी 4.15 वाजता सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ सोहळ्याच्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. यानंतर भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या 'ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे' सादरीकरण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी परंपरेला आदरांजली वाहण्यासाठी सिंधुदुर्ग येथे 'नौदल दिन 2023' साजरा केला जातो. दरवर्षी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांकडून 'ऑपरेशनल डिस्प्ले' आयोजित करण्याची परंपरा आहे.