For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी पोलंड, युक्रेन दौऱ्यावर

06:49 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी पोलंड  युक्रेन दौऱ्यावर
Advertisement

झेलेन्स्की यांच्याशी होणाऱ्या चर्चेकडे जगाचे लक्ष : पोलंडसोबत द्विपक्षीय करारांवर भर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर रवाना झाले असून सायंकाळी ते तेथे दाखल झाले. गेल्या 45 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. याआधी 1979 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पोलंड दौऱ्यावर पोहोचले होते. पोलंड दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी रेल्वेने युक्रेनला जाणार असून त्याठिकाणी समकक्ष नेत्यांची विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

Advertisement

विदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी सोशल मीडियावर ट्विट केले. “मी पोलंड आणि युव्रेनच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. पोलंडसोबतच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माझा दौरा होत आहे. पोलंड हा मध्य युरोपमधील आमचा आर्थिक भागीदार आहे.’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तसेच युव्रेन भेटीबाबत पंतप्रधान म्हणाले की, रशियासोबत सुरू असलेले युद्ध शांततेने सोडवण्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 21 ते 22 ऑगस्ट दरम्यान पोलंडच्या दौऱ्यावर असतील. यानंतर ते टेनने युव्रेनला रवाना होतील.

भारतीय समुदायाची भेट घेणार

पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण होत असताना होत आहे. सर्वप्रथम पोलंडची राजधानी वारसॉ येथे पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पोलंडमध्ये दाखल होताच त्यांनी राष्ट्राध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांची भेट घेतली. आता गुरुवारचा आणखी एक पूर्ण दिवस ते पोलंडमध्येच राहणार असून त्यांचा कार्यक्रम व्यग्र आहे. ते पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीला उपस्थित राहतील. तसेच ते भारतीय समुदायालाही भेटणार आहेत. पोलंडमध्ये भारतीय समुदायाचे 25 हजार लोक राहतात. त्यात सुमारे पाच हजार विद्यार्थी आहेत. पंतप्रधान मोदी जामनगर आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या स्मारकांनाही भेट देऊ शकतात. हे भारत आणि पोलंडमधील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.

भारत पोलंडसोबत संरक्षण व्यापार करत असून त्यामध्ये हेलिकॉप्टर, विमानाचे सुटे भाग आणि लष्कराच्या हार्डवेअरचा समावेश आहे. भारताच्या टी-72 रणगाड्यांच्या अपग्रेडेशनमध्ये पोलिश कंपनी बुमार लॅबेडीचे मोठे योगदान होते. दोन्ही देशांच्या सैन्याने अनेकदा संयुक्त सरावही केला आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि पोलंड यांच्यात अनेक करारही झाले आहेत. अलीकडे, हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेडने ऑप्टिकल फायबर प्लान्टसाठी 144 कोटी ऊपयांची गुंतवणूक योजना जाहीर केली होती. पुढील वषी पोलंड युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्ष बनणार असल्यामुळे पोलंडशी असलेले संबंध भारतासाठी राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहेत.

शुक्रवारी युव्रेनला भेट देणार

पोलंड दौऱ्यानंतर मोदी शुक्रवार, 23 ऑगस्टला युक्रेनला भेट देणार आहेत. ते पोलंड ते युक्रेन असा 10 तासांचा प्रवास रेल्वेने करतील. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना युक्रेन भेटीचे निमंत्रण दिले होते. 1991 मध्ये युक्रेन वेगळा देश झाल्यानंतर एकाही भारतीय पंतप्रधानाने तेथे भेट दिली नाही. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 आणि 9 जुलै रोजी रशियाला भेट दिली होती. काही दिवसांपासून युक्रेनने रशियन सीमेवर हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनने रशियाचा काही भाग आपल्या ताब्यात घेतल्यानंतर रशिया लवकरच युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच मोदी युक्रेन दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
Tags :

.