For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांचं संतुलन बिघडलयं...त्यांना उपचाराची गरज; पृथ्वीराज चव्हाण यांची टिका

06:42 PM May 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
पंतप्रधानांचं संतुलन बिघडलयं   त्यांना उपचाराची गरज  पृथ्वीराज चव्हाण यांची टिका
CM Prithviraj Chavan
Advertisement

या निवडणुकांमध्ये पंतप्रधानांनी खूप सभा घेतल्या असून त्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे आता त्यांना उपचाराची गरज असल्याची उपरोधिक टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पी.एन. पाटील हे या निवडणुकीला प्रचंड मतांनी निवडुण आले असते. आणि आमचं सरकार आलं असतं तर त्याच्या जेष्ठतेनुसार त्यांना मोठी संधी मिळाली असती असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=JdXjiKrudB8[/embedyt]

यावेळी माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळावर काँग्रेसच्या भुमिकेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, "काँग्रेस अध्यक्षांनी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी विभागवार समित्या नेमल्या आहेत. आम्ही सरकारकडे दुष्काळाची अधिकृत माहीती मागितीली आहे. आचार संहिता असल्यामुळे आमदारांना आपल्या मतदारसंघामध्ये दौरे करता येत नाहीत. पण आता मतदान झाल्या असुन आचारसंहिता शिथिल करून बैठका होणे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणावर बोलताना त्यांनी राज्यसरकारवर जोरदार टिका केली. या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक आणि ससून दवाखान्यातील हलगर्जीपणा हे भ्रष्टाचाराचं लक्षण आहे. राज्यात भ्रष्टाचारी सरकार स्थापन झालेलं आहे. श्रीमंतांना वेगळा कायदा आणि गरिबांना वेगळा न्याय हे सरकार देत आहे. असल्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच महाराष्ट्रात आणि देशात सत्ता बदल झालेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांना उपचाराची गरज
महात्मा गांधी हे चित्रपटामुळे देशभरात लोकप्रीय झाले या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात खुपच सभा घेतल्या असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्यांना आता उपचाराची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण बेताच आहे किंवा झालेलं नाही. म्हणूनच त्यांनी चित्रपट बघून त्यांनी गांधी समजून घेतला. याअगोदर धार्मिक आधारावर धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र तो चालला नाही. म्हणून आता ते महात्मा गांधीबद्दल बोलत आहेत. स्वतःच्या निवडणुकीत इतका भाग घेतला नाही तितका लोकसभा निवडणुकीत भाग घेतला अशी उपरोधिक टिका त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.