For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Prakash Ambedkar On PM Modi मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत, प्रकाश आंबेडकरांची 'एक्स'वरील पोस्ट चर्चेत

03:05 PM Jun 15, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
prakash ambedkar on pm modi मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत  प्रकाश आंबेडकरांची  एक्स वरील पोस्ट चर्चेत
Advertisement

त. भा. प्रतिनिधी मुंबई

Advertisement

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका पोस्ट (ट्विट) मधून आंबेडकर यांनी अमेरिकेतील घटनांवर भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदींना थेट लक्ष्य केले.

आंबेडकर म्हणाले की, 'कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या तीन नागरिकांच्या मृत्यूबाबत अमेरिकेकडे जाब विचारला असता, अमेरिकेला जबाबदार धरले असते आणि कठोर पावले उचलली असती. मात्र नरेंद्र मोदी तसे करत नाहीत.

Advertisement

अमेरिकेबाबत भारत सरकारची भूमिका अत्यंत लाचार असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले, 'मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहेत. त्यांच्या धोरणांमुळे भारत पुन्हा एकदा गुलाम देश बनत आहे. या वक्तव्यात आंबेडकर यांनी मोदींना उद्देशून वारंवार 'मोदी एक चूहा है' अशी टीका केली असून, त्यांच्या या

प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मोदींवर टीका करताना त्यांनी म्हटले की, 'मोदी हे संकटाच्या वेळी बिळात लपणाऱ्या उंदरासारखे वागतात. अन्यथा ते परदेश दौऱ्यांवर जाऊन टॉफी चॉकलेट वाटण्यात व्यस्त असतात. अमेरिकेबाबत भारत सरकारची भूमिका अत्यंत लाचार असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले, मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करत असल्याचेही ते म्हणाले.

वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या या विधानावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.