For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी शेवटच्या रांगेत

06:23 AM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजप खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी शेवटच्या रांगेत
Advertisement

सहकाऱ्यांकडून शिकणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला. या दरम्यान ते सभागृहामध्ये शेवटच्या रांगेत बसले होते. यासंबंधीचा फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ‘संसद कार्यशाळेत देशभरातील खासदारांनी सहकारी आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचार शेअर केले. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहेत’ असे ट्विट केले आहे. भाजप खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत खासदारांनी जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

Advertisement

भाजप खासदारांच्या कार्यशाळेला रविवारपासून प्रारंभ झाला असून ती सोमवारीही सुरू राहील. यामध्ये एकूण चार सत्रे होणार असून पक्षाचा इतिहास, विकास आणि खासदारांची कार्यक्षमता वाढवणे यावर चर्चा होईल. तसेच उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी 100 टक्के मतदानासाठी खासदारांना योग्य दिशा आणि प्रशिक्षण देणे हा त्याचा उद्देश आहे. प्रशिक्षण सत्रात खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीवेळी मतपत्रिकेवर योग्यरित्या चिन्हांकित करणे, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पेनचा वापर करणे आणि मतपत्रिका योग्यरित्या घडी करून बॉक्समध्ये टाकणे यासंबंधीची माहितीही दिली जाणार आहे. कोणत्याही खासदाराचे मत अवैध ठरू नये यासाठी ही माहिती दिली जाईल.

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी 8 सप्टेंबर रोजी एनडीए खासदारांसाठी डिनरचे आयोजन करणार होते, परंतु पंजाबसह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती असल्यामुळे ते रद्द करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी पूरग्रस्त राज्यांना भेट देतील आणि परिस्थितीचा आढावा बैठक घेतील. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.