For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीएम मोदींनी तेजस लढाऊ विमानातून केले उड्डाण 

01:48 PM Nov 25, 2023 IST | Kalyani Amanagi
पीएम मोदींनी तेजस लढाऊ विमानातून केले उड्डाण 
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कर्नाटकातील बेंगळुरू येथे तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. वास्तविक, त्यांनी शनिवारी बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या सुविधेला भेट दिली. या भेटीनंतर पीएम मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, या उड्डाणामुळे देशाच्या स्वदेशी क्षमतेवर माझा विश्वास आणखी वाढला आहे.

Advertisement

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या उड्डाणाच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी देखील उपस्थित होते.

या फ्लाइटचा अनुभव शेअर करताना पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अभिमानाने सांगू शकतो की, आमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही.

Advertisement

तेजस हे मेड-इन-इंडिया विमान असल्याची माहिती आहे. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान, पीएम मोदींनी तेजस उत्पादन सुविधा आणि इतर सुविधांचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांशी चर्चा केली.

Advertisement
Tags :

.