महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अब की बार...मोदी हद्दपार! संजयबाबा घाटगेंचा खरमरीत इशारा

03:55 PM Apr 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sanjay Baba Ghatge
Advertisement

शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ सेनापती कापशीतील सभेला लोटला महाजनसागर

कागल : प्रतिनिधी

कागलमध्ये विरोधातील काही नेते मंडळी दीड लाख मताधिक्याच्या वल्गना करत आहेत. मात्र काही झाले तरी कागलमधील जनता महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यासोबत आहे. त्यामुळे निवडणुकीत शाहू छत्रपतींना मिळालेले मताधिक्य पाहून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. कारण अब की बार... मोदी हद्दपार! हे सूत्र जनतेने ठरविले आहे, असा खणखणीत इशारा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिला.

Advertisement

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथे प्रचारसभेचे आयोजन केले होते. सभेला सेनापती कापशीसह आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठ गर्दी केली होती. यावेळी शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयबाबा घोरपडे, शहाजी घोरपडे, मालोजीराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

संजयबाबा घाटगे पुढे म्हणाले, शाहू छत्रपतींच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे भव्यदिव्य काम होईल. सत्ता ही लोककल्याणासाठी असते याचा आदर्श वास्तुपाठ शाहू छत्रपती आपल्या कृतीने घालून देतील. शाहू छत्रपती म्हणाले, इंडिया आघाडी लोकशाहीचे मूलभूत अधिकार टिकून राहावेत यासाठी एकवटली आहे. लोकांचे अधिकार कमी करण्याचा खटाटोप सुरू आहे. सत्ताधार्यांचा हा डाव जनता हाणून पाडेल.

फितुरांना गाडायचा इतिहास घडवायचा आहे
आ, सतेज पाटील म्हणाले, सेनापती कापशीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांची ही भूमी आहे. शत्रूच्या कळपात शिरून सोन्याचे कळस कापून आणण्याच्या कर्तबगारीचा जाज्वल्य इतिहास या भूमीची साक्ष आहे. शिवाय फितुरांना गाडायचं कामही केले. या भूमीने केले आहे. या लोकसभा निवडणुकीतही फितुरांना गाडायचा इतिहास घडवायचा आहे. कोण काय म्हणतंय विचार करू नका. परिवर्तनाच्या लढाईत कागलची जनता अग्रभागी राहणार यात शंकाची नाही.

दत्ताजीराव घाटगे यांनी मंडलिकांना उद्देशून तुमचे वय किती, उंची किती? शाहू छत्रपती यांच्यावर बोलण्याअगोदर जरा आरशात पाहा, अशी खोचक टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, हमीदवाडा कारखान्याचे माजी संचालक दयानंद पाटील, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सागर कोंडेकर, वंचित बहुजन आघाडीचे धनाजी सेनापतीकर यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कांबळे, सरपंच अबोली कांबळे, माजी सरपंच श्रद्धा कोळी यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.

50 खोक्यावर आम्ही जगत नाही : भारती पोवार
भारती पोवार म्हणाल्या, संजय मंडलिकांच्या एक कप चहाचा देखील आपण मिंधे नाही. आम्ही घरातील चांगला चहा पिऊन जगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या 50 खोक्यावर आम्ही जगत नाही.

खासदारांच्या घरी दिवाळी, कामगारांच्या घरी शिमगा!
गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे म्हणाले, शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांनी गरीबांना स्वत:च्या मालकीची शेकडो एकर जमीन मोफत दिली. त्यांच्यावर टीका करणार्या खासदारांनी स्वत:च्या मालकीची एक गुंठा तरी जमीन कोणाला दिल्याचे सिद्ध करावे. खासदारांच्या घरी ज्यावेळी दिवाळी असते, तेव्हा त्यांच्या कामगारांच्या घरी शिमगा असतो.

हा तर कृतघ्नपणाच!
आमदार पाटील म्हणाले, लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत आमचं ठरलंय या सूत्रामुळेच संजय मंडलिक खासदार झाले. त्यावेळी तुमच्या विजयासाठी आम्ही सार्यांनी जीवाचं रान केलं. कोणताही विचार न करता माझी राजकीय कारकिर्द तुमच्यासाठी पणाला लावली. स्टेजवर न जाता सगळी सूत्रे हलविली. त्यावेळी कोणाचा तरी पट काढायचा होता. निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला. आता तर मी उघडपणे निवडणुकीच्या मैदानात आहे. तेव्हा माझ्यावर टीका करताना चार वेळा विचार करा. केलेली मदत विसरणे हा कृतघ्नपणा आहे. प्राध्यापकांनी असे वागू नये, असं जाणती लोकं म्हणतात, हे मंडलिकांनी जाणावं.

Advertisement
Tags :
PM Modi deported Sanjay MandaliSanjay Baba GhatgeSanjay Mandali
Next Article