For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Why PM Modi said don't buy gold? : पुढचं वर्षभर सोनं का विकत घेऊ नका? काय आहे यामागचं कारण?

04:48 PM May 13, 2026 IST | NEETA POTDAR
why pm modi said don t buy gold    पुढचं वर्षभर सोनं का विकत घेऊ नका  काय आहे यामागचं कारण
Advertisement
सोन्याच्या खरेदीमुळे रुपया का घसरतोय? जाणून घ्या यामागचं खरं अर्थकारण!
BY - Goutami Shikalgar 
सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण! पण विचार करा, जर स्वतः देशाचे पंतप्रधानच तुम्हाला सांगत असतील की पुढचं वर्षभर सोनं विकत घेऊ नका, तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. तुमची एक छोटीशी सोन्याची खरेदी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी अडचणीत आणू शकते? चला, सोप्या भाषेत आपल्या छोट्या गोष्टीतून समजून घेऊया.

पण त्या आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जगण्यासाठी पेट्रोल-डिझेल लागतं, जेवणासाठी तेल लागतं. या गोष्टी आपण टाळू शकत नाही. पण सोनं ही आपली 'गरज' नसून ती एक 'गुंतवणूक' किंवा 'हौस' आहे. जेव्हा आपण सोनं घेतो, तेव्हा आपण देशाला जास्त गरजेच्या असलेल्या गोष्टींच्या बजेटवर नकळत परिणाम करत असतो.या सगळ्यात डॉलरचा खेळ चालतो कसा का?

Advertisement

आपण जेव्हा सोनं विकत घेतो, तेव्हा भारत सरकारला ते दुसऱ्या देशाकडून विकत घ्यावं लागतं. हे सोनं विकत घेण्यासाठी सरकारला डॉलर्स मोजावे लागतात. जेवढं जास्त सोनं आपण घेऊ, तेवढे जास्त डॉलर्स आपल्या देशाबाहेर जातील. आपल्या देशातून जेव्हा मोठ्या प्रमाणावर डॉलर्स बाहेर जातात, तेव्हा जागतिक बाजारात भारतीय रुपयाची किंमत कमी व्हायला लागते. रुपया कमकुवत झाला की आपल्या देशात इतर सगळ्या गोष्टी म्हणजे मोबाईल, गाड्या, पेट्रोल महाग होतात. म्हणजेच, आपल्या सोन्याच्या हौसेमुळे इतर वस्तूंचे भाव वाढू शकतात.

सोन्याचे भाव का वाढतायत?

Advertisement

सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत किंवा अस्थिरता आहे. जेव्हा जगाला भीती वाटते, तेव्हा मोठे गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून पैसा काढून सोन्यात टाकतात, कारण सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि भाव गगनाला भिडले आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं तर, आपला देश जितक्या रुपयांचा माल विकतो म्हणजे निर्यात करतो त्यापेक्षा जास्त रुपयांचा माल विकत घेतो म्हणजे आयात करतो. सोन्याच्या अतिखरेदीमुळे ही दरी अजून वाढतेय, जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही.
थोडक्यात सांगायचं तर, सध्या सोन्याचे भाव चढे आहेत आणि ते आयात केल्यामुळे आपल्या रुपयावर ताण येतोय. म्हणूनच, पुढचा काही काळ सोन्याची खरेदी थांबवून आपण देशाला आणि स्वतःच्या खिशालाही महागाईपासून वाचवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही यामागचं खरं अर्थकारण समजेल.
तर मंडळी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही तुमची सोन्याची खरेदी काही काळासाठी पुढे ढकलणार का? आणि मोदींच्या या आवाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तरुण भारतच्या युट्यूब, इंस्टा, एफबी चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.
Advertisement
Tags :

.