For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांसह कोल्हापूरातील नेत्यांना ‘जिब्लीची’ भुरळ

11:43 AM Mar 31, 2025 IST | Pooja Marathe
पंतप्रधानांसह कोल्हापूरातील नेत्यांना ‘जिब्लीची’ भुरळ
Advertisement

सोशल मिडीयावर जिब्लीची धुमः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील शेअर केले जिब्ली स्टाईल फोटोः कोल्हापूरातील नेत्यांनी शेअर केले जिब्ली-स्टाईल फोटोः ओपन एआयने २६ मार्चला लॉच केले होते हे टुलः या टुलचा वापर कऊन तुम्ही व्हीडीओ देखील जिब्ली-स्टाईल मध्ये करू शकतः जिब्ली-स्टाईल फोटो तयार करण्यासाठी करु शकता वेबसाईटचा वापर

Advertisement

कोल्हापूरः इंद्रजित गडकरी

सोशल मिडीयावर जिब्ली - स्टाईल ईमेजची चांगलीच धूम सुरू आहे. सर्वसामान नेटीझकडून याचा वापर वाढला असून याची भूरळ पंतप्रधान, मुख्यमंत्र्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनाही पडली आहे. या ग्रोक एआय जनरेटरवर फोटो अपलोड करून तो फोटो सोशल मिडीयावर शेअर करत सर्व नेते याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
सगळीकडे जिब्ली- स्टाईल ईमोजीने धुमाकूळ घातला आहे. सर्वच राजकीय नेत्यांपासून म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी जिब्ली- स्टाईल फोटो शेअर केले आहेत. सर्वजण सोशल मिडीयावर जिब्ली- स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी धडपडत आहेत. सर्व युजरना वापरता यावे यासाठी चॅटजीपीटीने हे टूल तयार केले. म्हणून अगदी काही क्षणात याचा ट्रेंड व्हायरल झाला. पण नंतर चॅटजीपीटीने हे पेड केले. सध्या लोकांना ही ईमेज करण्यासाठी अडचण येत आहेत पण तुम्ही ग्रोक एआय च्या मदतीने ही ईमेज तयार करू शकता.

Advertisement

ग्रोकवर कशी ईमेज तयार करू शकता

गेल्या आठवडाभरापुर्वी ग्रोकने या चॅटबॉटने सर्वच नेत्यांना घाम फोडला होता. याच इलॉन मस्क यांच्या ग्रोक एआयचा वापर करून तुम्हीही तुमचे फोटो तयार करू शकता. यासाठी तुम्हाला ग्रोक अॅप डाऊनलोड करून या चॅटवर तुमचा एखादा फोटो अपलोड करुन ‘कर्न्व्हट धीस ईमेज इनटु ? जिब्ली-स्टाईल’ असा प्रॉम्ट त्याला द्यावा. यानंतर काही सेकंदातच तुम्हाला जिब्ली-स्टाईल फोटो तयार झालेला दिसेल. ही ईमेज तयार करण्यासाठी तुम्ही ग्रोक 3.0 हे चॅटबॉट डाऊनलोड करू शकता. तुम्हाला चांगली क्वालिटी हवी असेल तर तुम्ही रनवे एम एल , लिओनार्डो एआय, मेग स्पेस, सारखे चॅटबॉट वापरू शकता.

कोल्हापूरातील नेत्यांना ही जिब्ली- स्टाईल फोटोची भूरळ
या जिब्ली-स्टाईल ईमजेचा वापर देशातील, राज्यातील सर्वच नेत्यांनकडून होताना दिसत आहे. त्यामध्ये कोल्हापूरातील नेतेही कुठे मागे नसल्याचे दिसून येत आहे. या नेत्यांमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे यांनी घिबीली स्टाईल फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

काय आहे जिब्ली- स्टाईल फोटो ?
चॅटजीपीटी किंवा ग्रोक एआय या टूलच्या माध्यमातून विविध विषयावर कॉमिक्स तयार करता येतात. हे ईमेज कार्टूनसारखे दिसतात किंवा कॉमिक्स पुस्तकांतील कथामध्ये असणारे फोटो वाटतात. आपले फोटोही ते टूल त्या कार्टूनसारखे तयार करून देते. ओपन एआय ने हे फिचर २६ मार्च ला मार्केट मध्ये आणल होत. याचा वापर करून तुम्ही व्हीडीओ देखील तयार कऊ शकता.

जिब्ली-स्टाईल या शब्दाचा अर्थ काय ?
याला दोन भाषांचे सदर्भ आहेत एक इटालियन आणि दुसरी अरबी अरबी भाषेत त्याला गरम किंवा कोरडा वाळवंटातील वारा म्हणतात. १९८५ मध्ये हायाओ मियाझाका, इसाओ टाका, तोशिओ सुझुकी यांनी जिब्ली अॅनिमेशन स्टुडीओची स्थापना केली होती. जिब्ली-स्टाईल ह्रदयस्पर्शी केलेल्या स्टोरी यांचा संदर्भ देते.

वेबसाईटच्या मदतीने देखील करू शकता जिब्ली-स्टाईल फोटो
क्लीपीफाय एआय, गेटीएमजी एआय, फोटोर. कॉम, फ्लक्स १ एआय, इनसमांईन्ड, फ्केस् लिप. कॉम, ग्रोक एआय, झीन एआय, या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही जिब्ली-स्टाईल ईमेज तयार करू शकता.

Advertisement
Tags :

.