एसटी, केएमटीच्या प्रवाशांचे हाल
कोल्हापूर :
एसटी आणि केएमटीच्या बसचा वापर निवडणूक ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांसह निवडणूक साहित्य मतदान केंद्रामध्ये पोहोचविण्यासाठी करण्यात आला. एसटीच्या काही मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली होती. परिणामी मंगळवारी सकाळ सत्रात एसटी आणि केएमटी सेवा विस्कळीत झाली.
विधानसभेची निवडणूकीसाठी आज, बुधवारी मतदान आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचाऱ्र्याना तसेच मतदान साहित्य मंगळवारी सकाळी मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोच झाले. यासाठी 451 एसटी आणि 50 केएमटीचा वापर झाला. या सर्व एसटी आणि केएमटी बस दुपारी 12 नंतर पुन्हा सेवेत दाखल झाल्या. दरम्यान, सकाळ सत्रात प्रवाशांची गैरसोय झाली. आज बुधवारी मतदान होणार आहे. यानंतर मतदान केंद्रावरून कर्मचारी आणि साहित्य पुन्हा संबंधित मतदार संघातील निवडणूक कार्यालयामध्ये आणली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी दुपारनंतरही एसटी, केएमटी सेवा विस्कळीत होणार असून प्रवाशांना पर्यायी वाहतूक सेवेचा वापर करावा लागणार आहे.