महायुतीची सत्ता येण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या ; माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांचे आवाहन
महायुतीच्या माध्यमातून विकासासाठी कटिबद्ध – उदय बुगड
इचलकरंजी : केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहराचा पर्यायाने प्रभागाचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही कटीबध्द आहोत. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी आम्हांला मतरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांनी केले.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतल प्रभाग ८ मधील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रविंद्र माने, रुपा बुगड, पारिसनाथ घाट आणि श्वेता मालवणकर यांच्या प्रचार पदयात्रेचा पद शुभारंभ मान्यवरांसह भागातील ज्येष्ठ महिलांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी यांना अभिवादन आणि संकटमोचन हनुमानाचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला. मंगळवार पेठ परिसरात काढण्यात आलेल्या वा पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसादमिळाला.
यावेळी प्रकाशराव सातपुते, उदय बुगड, नजमा शेख, वैशाली डोंगरे, मोहन मालवणकर, जयेश बुगड आदिंसह प्रभागातील महायुतीचे महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.