For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिकचा होणार खात्मा

06:43 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिकचा होणार खात्मा
Advertisement

पॉलिथिन बॅग अन् बाटल्या फस्त करणारा फंगस आढळला

Advertisement

प्लास्टिक सध्या पूर्ण जगातील सर्वात मोठी पर्यावरणीय समस्या ठरले आहे. प्लास्टिक लाखो वर्षांपर्यंत सडत नाही आणि जमीन, नद्या, समुद्रांना प्रदूषित करत राहतो. परंतु आता वैज्ञानिकांना एक असा चमत्कारी फंगस मिळाला आहे, जो प्लास्टिकला स्वत:चे भोजन करतो. अमेझॉन वर्षावनांमध्ये शोधण्यात आलेला हा फंगस प्लास्टिकचे विविध प्रकार, खासकरून पॉलिथिनला तोडण्यास सक्षम आहे. हा शोध पर्यावरण वैज्ञानिकांसाठी मोठा दिलासा अन् आशेचा किरण ठरला आहे. या फंगसच्या मदतीने प्रदूषणाला रोखता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फंगसचा शोध कसा लागला?

Advertisement

वैज्ञानिकांची टीम अमेझॉनच्या घनदाट जंगलांमध्ये मायक्रोऑर्गेनिज्म्सचा शोध घेत होती. तेथे त्यांना एक असा फंगस मिळाला होता, प्लास्टिकच्या पृष्ठभागावर उगवतो आणि हळूहळू त्याला फस्त करून टाकतो. प्रयोगशाळेत हा फंगस पॉलिथिन बॅग, प्लास्टिक बाटली आणि इतर सिंथेटिक पॉलिमरला ब्रेकडाउन करण्यास यशस्वी ठरला आहे. फंगस प्लास्टिकच्या केमिकल बाँडला तोडून त्याला सरल कंपाउंडमध्ये बदलून टाकतो, जो पर्यावरणासाठी कमी हानिकारक असतो.

कसे काम करतो हा फंगस?

हा फंगस प्लास्टिकला स्वत:चे अन्न मानून एंजाइम्स जारी करतो. हे एंजाइम्स प्लास्टिकच्या दीर्घ चेनला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडतात, प्रक्रिया मंद आहे, परंतु नैसर्गिक अन् सुरक्षित आहे. वैज्ञानिक आता याला वेगवान करण्याच्या पद्धती शोधत आहेत.

प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या

?दरवर्षी कोट्यावधी टन प्लास्टिक समुद्रांमध्ये पोहोचते.

?प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक होत अन्नसाखळीत सामील होतेय.

?प्राणी अन् पक्षी प्लास्टिक शरीरात पोहोचत असल्याने मृत्यूमुखी पडत आहेत.

?मातीची सुपीकता प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे घटत आहे.

?अशास्थितीत हा फंगस एक नैसर्गिक उपाय ठरण्याची शक्यता आहे.

भविष्यातील शक्यता

या फंगसचा वापर लँडफिल, साइट्स, रिसायकलिंग प्लँट्स आणि प्रदूषित भागांमध्ये केला जाऊ शकतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. जर याला मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आल्यास प्लास्टिक कचरा साफ करण्यात क्रांतिकारक बदल घडून येऊ शकतो. काही कंपन्या पूर्वीपासून प्लास्टिक फस्त करणारे बॅक्टेरिया आणि फंगसवर संशोधन करत आहेत. हा शोध त्याच दिशेने एक मोठे पाऊल आहे.

अन्य नैसर्गिक उपाय

?प्लास्टिक फस्त करणाऱ्या काही बॅक्टेरियांची यापूर्वीच ओळख पटली आहे.

?काही किडे (उदाहरणार्थ वॅक्स वर्म) प्लास्टिकला पचवू शकतात.

?निसर्गात असे अनेक मायक्रोऑर्गेनिज्म आहेत, जे मानवनिर्मित कचऱ्यालाही तोडू शकतात.

Advertisement
Tags :

.