For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिक उत्पादनात दरवर्षी 8.4 टक्क्यांची वृद्धी

07:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिक उत्पादनात दरवर्षी 8 4 टक्क्यांची वृद्धी
Advertisement

रिसायकलिंगचा दर केवळ 10 टक्के

Advertisement

जगभरात प्लास्टिकचे उत्पादन अनियंत्रितपणे वाढत आहे. परंतु रिसायकलिंगचे प्रमाण अद्याप चिंताजनक स्थितीत आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर 40 कोटी टन प्लास्टिकची निर्मिती झाली, परंतु यातील केवळ 3.8 कोटी टन म्हणजेच जवळपास 9.5 टक्के प्लास्टिकचे रिसायकलिंग झाले. प्लास्टिकच्या पुनर्चक्रण प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि धोरणांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे हा आकडा दर्शवितो. प्रतिष्ठित कम्युनिकेशन्स अर्थ अँड एनव्हायरनमेंट जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार प्लास्टिक उत्पादनात दरवर्षी 8.4 टक्क्यांची वृद्धा होत आहे.

2050 पर्यंत प्लास्टिक उत्पादनाचा आकडा दुप्पट होत 80 कोटी टनावर पोहोचण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये जगभरात 26.8 कोटी टन प्लास्टिक कचरा हाताळण्यात आला. यातील केवळ 27.9 टक्के हिस्स्याला वेगळे करत रिसायकलिंगच्या प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. या वेचलेल्या हिस्स्यापैकी केवळ निम्मे प्रमाणच पुनर्चक्रित करण्यात आले, तर 41 टक्के प्लास्टिक कचरा जाळण्यात आला आणि उर्वरित 8.4 टक्के लँडफिलमध्ये टाकण्यात आला.

Advertisement

मानवी जीवनाला धोका

मायक्रोप्लास्टिक कण पृथ्वीच्या प्रत्येक हिस्स्यात आता आढळू लागले आहेत. जमिनीपासून समुद्र तसेच मानवी शरीरातही आढळत आहेत. प्लास्टिक आता एंथ्रोपोसीन किंवा मानवी युगाची भौगोलिक ओळख ठरले असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. जोपर्यंत प्लास्टिक उत्पादन जीवाश्म इंधन म्हणजेच तेल आणि गॅसवर आधारित असेल, तोपर्यंत रिसायकलिंग आणि हवामान संकटाला सामोरे जाणे अत्यंत कठिण असेल.

मिनिटाला 10 लाख बाटल्यांची खरेदी

2022 मध्ये फेकण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा जवळपास 40 टक्के हिस्सा म्हणजेच 10.4 कोटी टन लँडफिलमध्ये गेला. परंतु हा आकडा 1950-2015 पर्यंतच्या सरासरीच्या 79 टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु स्थायी तोडग्यापासून अद्याप खूपच दूर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला जगभरात 10 लाख प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी केल्या जातात आणि दरवर्षी 5 लाख कोटी प्लास्टिक बॅग्जचा वापर होतो. यातून प्लास्टिकच्या उत्पादनाचा निम्मा हिस्सा सिंगल युज आइटम्ससाठी असल्याचे स्पष्ट होते.

जागतिक असमानता

अध्ययनानुसार अमेरिकेत दरडोई प्लास्टिकचा वापर सर्वाधिक 2016 किलो वार्षिक आहे. यानंतर जपान (129 किलो) आणि युरोपीय महासंघ (86.6 किलो)चा क्रमांक लागतो. तर एकूण वापरात चीन आघाडीवर असून तेथे 2022 मध्ये 8.15 कोटी टन प्लास्टिकचा वापर झाला. यानंतर अमेरिका 4 कोटी टन, युरोप 3 कोटी टन, भारत 94.8 लाख टन आणि जपान 45 लाख टन असे प्रमाण आहे. चीन एकूण जागतिक वापराच्या 20 टक्के वापरतो. अमेरिका 18 टक्के, युरोपीय महासंघ 16, अन्य आशियाई देश 12, मध्यपूर्व 7 टक्के, भारत 6 टक्के, जपान 4 टक्के आणि आफ्रिका 5 टक्के हिस्स्यासाठी जबाबदार आहे.

Advertisement
Tags :

.