For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.कडून प्लास्टिक पत्रावळी, कचऱ्याची उचल

11:04 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक ग्रा पं कडून प्लास्टिक पत्रावळी  कचऱ्याची उचल
Advertisement

लक्ष्मीयात्रा पार्श्वभूमीवर राबविला स्तुत्य उपक्रम

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांकडून पै-पाहुणे व मित्रमंडळींना मांसाहार प्रसादाचे वाटप करण्यात आले. जेवणाच्या पत्रावळी तसेच इतर प्लास्टिक साहित्याचे ग्रा. पं.कडून घरोघरी जाऊन गाडीतून दररोज कचरा उचल करत संपूर्ण गाव स्वच्छ करत असल्यामुळे ग्रामपंचायत पीडीओ गोविंद रंगापगोळ व इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक करण्यात येत आहे. गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 28 एप्रिल ते 6 मेपर्यंत साजरी होणार असून यात्रेचा आजचा आठवा दिवस असूनही लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची अलोट गर्दी लोटत आहे. गावातील संपूर्ण गल्ल्या पै-पाहुण्यांनी भरून गेल्याचे पाहावयास मिळत आहे.

Advertisement

ग्रामपंचायतचे कौतुक

यात्राकाळात बुधवार दि. 29 पासून संपूर्ण गावभर घरोघरी मांसाहार प्रसादाचे वाटप सुरू होते. यावेळी जेवणावळीसाठी वापरण्यात आलेल्या पत्रावळ्या प्लास्टिक साहित्यासह इतर साहित्य एका पिशवीमध्ये जमा करा, सकाळी ग्रामपंचायतची कचरा गाडी येईल त्यामध्ये सर्व प्लास्टिक साहित्य टाकावे, असे ग्रा.पं. पीडीओ गोविंद रंग्यापगोळ यांनी ग्रामस्थांना आवाहन केले होते. आणि ग्रामस्थांनीही प्लास्टिक कचरा, पत्रावळी व इतर साहित्य कचरा गाडीमध्ये टाकून स्वच्छ भारत आंदोलन यशस्वी केल्यामुळे ग्रामस्थांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.यात्रा काळात कचऱ्यामुळे दुर्गंधी येते, यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीमुक्त बनला आहे.

Advertisement
Tags :

.