मिरजेत उद्यापासून लावणी महोत्सव
मिरज :
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी एक ते सोमवारी तीन मार्चपर्यंत हा लावणी महोत्सव रंगणार आहे. लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृती जाणून घेण्याची परवणी नागरिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती सांस्कृतीक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
ते म्हणाले, पुढच्या पिढीला संस्कृतीची व परंपरेची ओळख, व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली लावणी महोत्सव होत आहे. या महोत्सवात राज्यातील विविध लावणी कलापथक आपली कला सादर करणार आहेत.
शनिवारी प्रिया नगरकर सांगितबारी पार्टी, चौफुला, रेश्मा-वर्षा-परितेकर सांगितबारी पार्टी, सणसवाडी, प्रीती परळीकर सांगितबारी पार्टी, चौफुला हे कलापथक आपली कला सादर करणार आहेत. तर रविवारी शितल-पूजा भूमकर सांगितबारी पार्टी, सणसवाडी, मंगल-माया खामगावकर सांगितबारी पार्टी, मोडनिंब अशा-रूपा परभणीकर सांगितबारी पार्टी, मोडनिंब या संघाची कला सादर होणार आहे.
या लावणी महोत्सवाचा समारोप सोमवारी होणार असून छाया-श्रद्धा कोल्हापूरकर सांगितबारी पार्टी, वाठार, निर्मला-अनिता अष्टीकर सांगितबारी पार्टी चोराखळी, ज्योत्स्ना वाईकर सांगितबारी पार्टी, वेळे नंदा-प्रमिला संगीता लोदगेकर सांगितबारी पार्टी, मोडनिंब हे कलापथक आपली कला सादर करणार आहेत. हा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य असून याचा आस्वाद घ्यावा.