महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पावसाळा सुरू होताच खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण

10:48 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनविभाग-महानगरपालिका संयुक्तरित्या मोहीम राबविणार

Advertisement

बेळगाव : स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे करण्यात आली. ही कामे करत असताना अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे शहरातील झाडांची संख्या कमी झाली आहे. याबाबत महानगरपालिकेतील साहाय्यक पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी यांना विचारले असता वनविभाग आणि महानगरपालिका संयुक्तरित्या पावसाळा सुरू झाल्यानंतर वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वळीव पावसामुळे धोकादायक असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. यामुळे जीवितहानी तसेच वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा अशी धोकादायक झाडे हटविण्याबाबत विचारले असता वनविभाग तसेच महानगरपालिकेतर्फे धोकादायक झाडांची पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे. झाडांची संख्या ही कमी झाली आहे. मात्र केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार दरवर्षीच मनपाला वृक्षारोपण करावे लागते. त्याच पद्धतीने यावर्षीही खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सर्व कर्मचारी गुंतले आहेत. 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर प्रलंबित कामांबरोबरच नवीत प्रकल्प राबविण्याबाबत तसेच वृक्षारोपण करण्याबाबत आराखडा तयार केला जाणार आहे. मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या मार्गदर्शनानुसार ही सर्व कामे केली जातील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

खुल्या जागांमध्ये जास्तीतजास्त झाडे लावणार

शहरातील अनेक रस्त्यांवरील झाडे हटविली गेली आहेत. काही झाडे पावसामुळे उन्मळून पडली आहेत. तर सध्या अजूनही अत्यंत जुनाट व धोकादायक झाडे आहेत. त्याबद्दल जनता तक्रार करत आहे. ती झाडे वनविभागाने सर्व्हे केल्यानंतरच हटविली जाणार आहेत. याचबरोबर पावसाळा सुरू होताच खुल्या जागांमध्ये जास्तीतजास्त झाडे लावणार असल्याचे अभियंते कलादगी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article