For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणमध्ये ‘व्हेनेझुएला मॉडेल’ची योजना

06:22 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणमध्ये ‘व्हेनेझुएला मॉडेल’ची योजना
Advertisement

सर्वोच्च नेत्यासाठी ट्रम्प यांनी सुचविले 3 नावे

Advertisement

आवश्यकता भासल्यास अमेरिकेचे सैन्य इराणवर 4-5 आठवड्यांपर्यंत हल्ले जारी ठेवू शकते असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.  तसेच त्यांनी तेहरान येथे व्हेनेझुएला मॉडेल संघर्षानंतरच्या परिवर्तनाला आकार देऊ शकते असे सुचविले आहे. या मॉडेल अंतर्गत केवळ सर्वोच्च नेत्याला हटवून देशाच्या बहुतांश व्यवस्थेला कायम ठेवले जाणार आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अभियान जारी ठेवण्याबद्दलचा स्वत:चा विश्वास व्यक्त करत वारंवार दक्षिण अमेरिकेतील एका यशस्वी सैन्य अभियानाचा उल्लेख केला आहे.

व्हेनेझुएलासारखी स्थिती अत्यंत योग्य

Advertisement

व्हेनेझुएलामध्ये आम्ही जे केले, तीच अत्यंत योग्य दृश्यस्थिती आहे. व्हेनेझुएलात केवळ सर्वोच्च नेत्याला हटविण्यात आले, तर सरकारचा बहुतांश हिस्सा कायम राहिला. दोन लोकांना सोडून उर्वरित सर्वांची नोकरी वाचली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  इराणवरील अभियान 4-5 आठवड्यांपर्यंत चालविण्याचा आमचा विचार आहे. हे अवघड ठरणार नाही. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.

माझ्याकडे 3 नावं

इराणमध्ये खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सत्ता सांभाळू शकतील अशी तीन जणांची नावे माझ्याकडे आहेत. मी आताच नावांचा खुलासा करणार नाही. प्रथम काम पूर्ण करून घेऊया. इराणचे सैन्याला शस्त्रास्त्रs खाली ठेवावी लागतील अशी वेळ येणार आहे. इराणचे सैन्य खरोखरच  लोकांसमोर आत्मसमर्पण करणार आहे. अधिकारी स्वत:ची शस्त्रास्त्रs जनतेकडे सोपवतील असा दावा ट्रम्प यांनी मुलाखतीत केला आहे.

इराणवरील बंदी हटविणार का?

इराणचा नवा नेता व्यवहारिक सिद्ध झाला तर त्या देशावरील बंदी हटविण्याचा विचार करणार आहे. परंतु इराणचा नवा नेताही विरोधात भूमिका घेणारा निघाल्यास त्याचा बचाव करू शकणार नाही. मी कुठल्याही प्रकारची प्रतिबद्धता व्यक्त करणार नाही. इराणप्रकरणी आम्हाला काम करावे लागणार आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी आखती देशांच्या सहकार्याची अमेरिकेला गरज नसल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.