For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीसाठी 200 बसेसचे नियोजन

06:48 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीसाठी 200 बसेसचे नियोजन
Advertisement

सोमवारी-मंगळवारी काही भागातील बससेवा तात्पुरती रद्द

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणुकीसाठी परिवहनकडून 200 बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी काही मार्गांवरील बससेवा तात्पुरती रद्द केली जाणार आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी बसचे नियोजन करण्यात आले असून सोमवार दि. 6 आणि मंगळवार दि. 7 मे रोजी  काही मार्गांवरील बससेवा बंद राहणार आहे, अशी माहिती परिवहनने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement

निवडणुकीसाठी परिवहनकडे 400 बसेसची मागणी करण्यात आली होती. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने 200 बसेसची जुळवाजुळव करण्यात आली आहे. यासाठी बेळगाव, बैलहोंगल, खानापूर आगारातील काही बसेस बंद ठेवल्या जाणार आहेत.

या भागातील बस फेऱ्या रद्द...

बेळगाव आगारातील धारवाड, विजापूर, गोकाक, कुकडोळी, पाच्छापूर, बैलहौंगल, कोल्हापूर, हुबळी, संकेश्वर, रामनगर, हल्ल्याळ, दांडेली, शिरसी आदी भागातील बसेस बंद ठेवल्या जाणार आहेत.

शहरांतर्गत संतिबस्तवाड, मार्कंडेयनगर, करडीगुद्दी, हंदिगनूर, सुळगा, अनगोळ, वडगाव, रामतीर्थनगर, आरसीयूनगर, कर्ले, रणकुंडये, बस्तवाड, के. के. कोप्प, सुळेभावी, बसरीकट्टी, देसूर आदी भागातील बसफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कित्तूर, कलबुर्गी, धारवाड, यरगट्टी, नेसरगी, अंकलगी, खानापूर, पणजी, बिडी, दांडेली, वेंगुर्ला आदी मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द केल्या जाणार आहेत.

मंगळवार दि. 7 मे रोजी निवडणुकीसाठी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्था आणि कार्यालये बंद राहणार आहेत.  निवडणुकीसाठी बसेस देण्यात आल्याने काही भागातील बससेवाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी यंत्रसामग्री, व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन, पोलीस आणि मतदान कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बसेस लागणार आहेत. परिणामी सार्वजनिक बस वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

Advertisement
Tags :

.