विमान धमकीतील दोषींना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकणार
विमानांमधील बॉम्बच्या धमक्मयांवर सरकार कायदेशीर कारवाईच्या पवित्र्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमानोड्डाणांवर बॉम्ब ठेवल्याच्या घटनांचा सामना करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखली जात आहे. धमक्मया देणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात येईल, असे नागरी विमानोड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले. विमान वाहतूक सुरक्षेच्या नियमांसोबत नागरी विमान वाहतूक कायदा, 1982 मध्ये सुधारणा करण्याचेही नियोजन केले जात आहे. याचदरम्यान, नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोचे (बीसीएएस) महासंचालक झुल्फिकार हसन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक राजविंदर सिंग भाटी यांनी सोमवारी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास ही बैठक चालली, मात्र या बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
गृह मंत्रालयाने नागरी उड्डाण मंत्रालय आणि बीसीएएसकडून विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्मयांबाबत सविस्तर अहवाल मागवला होता. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबी यांनाही अहवाल सादर करण्यास सांगितले होते. 20 ऑक्टोबर रोजी इंडियन एअरलाईन्सच्या 25 विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या होत्या. त्यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी 30 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या होत्या. मात्र, या धमक्मया खोट्या असल्याचे नंतर उघड झाले. गेल्या आठवड्यात सुमारे 100 विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्याने विमान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच आपत्कालीन लँडिंगमुळे विमान कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसावे लाग आहे. वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरी विमान वाहतूक महासंचालक विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवून अन्यत्र बदली केली आहे.