For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोरंटोमध्ये लँडिंगदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त

10:45 PM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
टोरंटोमध्ये लँडिंगदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त
Advertisement

कॅनडात दुर्घटना : सुदैवाने जीवितहानी नाही : 18 प्रवासी जखमी वृत्तसंस्था

Advertisement

टोरंटो

डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान टोरंटोच्या पियर्सन विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. लँडिंगवेळी विमान धावपट्टीवरून घसरत उलटले, मिनियापोलिस येथून येत असलेल्या या डेल्टा फ्लाइटमध्ये 76 प्रवासी अन् चालक दलाचे 4 सदस्य होते.

Advertisement

दुर्घटनेनंतर घटनास्थळावरील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात मित्सुबिशी सीआरजे-900एलआर विमान बर्फाळ पृष्ठभागावर उलटल्याचे दिसून येते. टोरंटोमध्ये आलेल्या हिमवादळामुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. सर्व प्रवासी अन् चालक दलाच्या सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. विमान धावपट्टीवरून घसरून उलटले, परंतु या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नाही. विमान उलटण्यामागे हवामान कारणीभूत असू शकते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विमानतळ परिसरात जोरदार हिमवृष्टी सुरू होती आणि वारे 52 किलोमीटर ते 65 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वाहत होते. तर तापमान जवळपास उणे 8.6 अंश सेल्सिअस इतके होते.

विमान दुर्घटनेनंतर जीवितहानी टळण्याचे श्रेय प्रथम प्रतिसाद दल आणि अन्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे असल्याचे उद्गार टोरंटो पियर्सन इंटरनॅशनल एअरपोर्टचे अध्यक्ष आणि सीईओ डेबोरा फ्लिंट यांनी काढले आहेत.

जोपर्यंत विमान जमिनीवर आदळले नाही, तोपर्यंत नेमकं काय घडतेय हेच कळत नव्हतं. विमान आदळल्यावर आम्ही वटवाघळांप्रमाणे उलटे लटकलो होतो. मग सीट बेल्ट खोलल्यावर आम्ही खाली कोसळलो, त्यानंतर आम्हाला विमानातून बाहेर काढण्यात आल्याचे कोकोव या प्रवाशाने सांगितले.

Advertisement
Tags :

.