For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्राझीलमध्ये रेस्टॉरंटवर कोसळले विमान

06:11 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्राझीलमध्ये रेस्टॉरंटवर कोसळले विमान
Advertisement

अपघातात एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया

ब्राझीलमध्ये एक छोटे विमान रेस्टॉरंटवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रिओ ग्रांदे दो सुल राज्यात घडला. पायपर मालिबू हे विमान साओ पावलोहून कापाओ दा कानोआ विमानतळाकडे जात होते. लँडिंगपूर्वी विमान एका खांबाला धडकल्यानंतर एका रेस्टॉरंटवर कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात पायलट आणि एका जोडप्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. सुदैवाची बाब म्हणजे, विमान कोसळण्याच्या वेळेस रेस्टॉरंटमध्ये वर्दळ कमी असल्याने प्रवाशांव्यतिरिक्त अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

विमान दुर्घटनेत रेस्टॉरंट व आसपासचे लोक सुदैवाने बचावले. अपघातानंतर रेस्टॉरंटमध्ये मोठी आग लागल्यामुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले होते. नागरी संरक्षण पथकांनी जवळच्या घरांतून रहिवाशांना बाहेर काढले. मात्र, आगीत जवळच्या एका दुकानाचेही नुकसान झाल्याचे राज्यपाल एडुआर्डो लेइट यांनी सांगितले. या अपघातानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या होत्या. तसेच अपघाताची कसून चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.