चीनमध्ये विमानाची इमारतीला धडक
► वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘सिटिक टॉवर’ला एका विमानाने धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान एक छोटे विमान होते. हे विमान या 109 मजली इमारतीला धडकल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये 1,700 फूट उंच इमारतीवरून छोट्या विमानाचे तुकडे खाली पडताना दिसत आहेत. तसेच तळमजल्याजवळ ढिगारा विखुरलेल्या ठिकाणी दाट धुराचे लोट बाहेर पडतानाही दिसत होते. या धडकेमुळे दोन खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे जमिनीवर पडताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील छायाचित्रांमध्ये टॉवरच्या बाजूला एक मोठे छिद्र दिसत आहे. बीजिंग बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
‘सिटिक टॉवर’ हा बीजिंगमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. ही भव्य वास्तू चाओयांग जिह्याच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात आहे. ‘चायना झुन’ म्हणून ओळखली जाणारी ही इमारत 1,700 फूट उंच आहे. या इमारतीला धडकलेले विमान बी-12पीपी प्रकारचे होते. या अपघातातील जीवितहान्aााrच्या संख्येबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. एका अहवालानुसार, पायलट एकटाच विमान चालवत होता. त्याने शिफोसी विमानतळावरून उ•ाण केले होते. सायंकाळी 5:40 वाजता विमान विमानतळावर परत उतरण्याच्या तयारीत असताना ते नियोजित मार्गापासून भरकटले. उ•ाणानंतर जवळपास अर्ध्या तासाने विमानाचा संपर्क तुटला आणि तो पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही.
..................