For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू

06:03 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये विमान कोसळले  9 जणांचा मृत्यू
Advertisement

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये 9 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. दुर्घटनेत विमानातील सर्व 9 जणांचा मृत्यू झाला. हे विमाना आकाशातून जमिनीवर एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे कोसळले. जमिनीला आदळताच यात मोठा विस्फोट झाला आणि ते आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. ही दुर्घटना पाम काउंटीच्या क्रेस्टहेवन नजीक घडली आहे. हे विमान तेथील घरांपासून काही अंतरावर कोसळल्याने अधिक जीवितहानी टळली आहे.

Advertisement

दुर्घटनेवेळी कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी कोसळणाऱ्या विमानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसेंटिस यांनी ही एक अत्यंत विनाशकारी दुर्घटना होती असे म्हटले आहे. टेक्सासच्या ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उ•ाण केलेले लियरजेट 60 विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे.

दुर्घटनेपूर्वी वैमानिकांनी विमानात तीव्र टर्ब्युलेंसची माहिती दिली होती आणि ते आणखी 2000 फूट वर नेण्याची अनुमती मागितली होती. त्यानंतर स्थिती आणखी बिघडू लागल्याने वैमानिकाने ‘मेडे, मेडे“ असे म्हणत इमर्जन्सी घोषित केली. अखेरच्या क्षणांमध्ये विमान 30 हजार फूट प्रतिमिनिटाच्या वेगाने खाली येत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.