For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या अलास्कामध्ये विमान कोसळले, 8 ठार

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या अलास्कामध्ये विमान कोसळले  8 ठार
Advertisement

अलास्का : अमेरिकेच्या पश्चिम अलास्का भागात एक चार्टर्ड विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि 6 प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान गूडन्यूज बेपासून जवळपास 40 मैल अंतरावरील केप न्यूएनहॅमच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. केप न्यूएनहॅम ही एक वायुदलाची धावपट्टी असून ती दीर्घ अंतरावरील रडारस्टेशनपर्यंत पोहोच प्रदान करते.

Advertisement

Advertisement
Tags :

.