For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले

06:22 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले
Advertisement

दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Advertisement

ओटावा: कॅनडात फ्लाइट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या एका हवाई दुर्घटनेत 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कॅनडातील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेची पुष्टी दिली आहे. या दुर्घटनेत तामिळनाडूतील मनोज शिवकुमार आणि पुड्डुचेरीचा श्रीसरन तिरुज्ञानसंबंधम हे मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेसंबंधी व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला. या कठिणसमयी आमच्या संवेदना शोकाकुल परिवार आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत आहेत. दोन्ही विद्यार्थी कॅनडात स्वत:च्या कमर्शियल पायलट आणि एव्हिएशन ट्रेनिंगच्या अंतर्गत विमानोड्डाणाचा सराव करत असताना ही दुर्घटना घडली आहे. आम्ही स्थानिक अधिकारी आणि पीडित परिवारांच्या संपर्कात आहोत. दोन्ही विद्यार्थ्यांचे पार्थिव भारतात त्यांच्या गावी नेण्याच्या प्रक्रियेत परिवाराला सहाय्य प्रदान केले जात असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले. तर कॅनडातील स्थानिक प्रशासन या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.