For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलंबियात विमान दुर्घटना, खासदारासह 15 जणांचा मृत्यू

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोलंबियात विमान दुर्घटना  खासदारासह 15 जणांचा मृत्यू
Advertisement

बोगोटा : दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाच्या नॉर्टे डी सँटेंडर प्रांतात एक विमान दुर्घटना ग्रस्त झाले आहे. या विमान दुर्घटनेत एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सटेना या शासकीय विमानो•ाण कंपनीने कुरासिका भागात विमान कोसळले असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने प्रवाशांच्या स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी एक बचावपथक घटनास्थळी रवाना केले आहे. या विमानातून चालक दलाचे दोन सदस्य आणि खासदार डायोजेनेस कितेरा यांच्यासमवेत 13 जण प्रवास करत होते. विमानातून प्रवास करणाऱ्या कुणाचाच जीव वाचू शकला नसल्याची पुष्टी कंपनीने दिली आहे. या विमानाने कुकूता विमानतळावरून ओकाना शहराच्या दिशेने उ•ाण केले होते. उ•ाण केल्याच्या काही मिनिटातच या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटला होता. या दुर्घटनेमुळे कोलंबियातील विमानांच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोलंबियाच्या सरकारने दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.