For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संपूर्ण गाझापट्टी ताब्यात घेण्याची योजना

06:40 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
संपूर्ण गाझापट्टी ताब्यात घेण्याची योजना
Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

संपूर्ण गाझापट्टी ताब्यात घेण्याच्या योजनेला इस्रायलच्या मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. त्याचप्रमाणे गाझा पट्टीचा उत्तर भाग पूर्णपणे रिकामा करण्याची आणि लक्षावधी पॅलेस्टाईनींना दक्षिण गाझामध्ये हलविण्याची योजनाही इस्रायलने सज्ज केली आहे. इस्रायलचे काही ओलीस आजही हमासकडे असून हमासने त्यांची सुटका करावी, यासाठी इस्रायलने दबाव तंत्राचा उपयोग चालविला आहे.

इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सोमवारी आपल्या देशाच्या तीन्ही सेनाप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी भविष्यकालीन योजनांसंबंधी सविस्तर चर्चा केली. गाझा पट्टीवर पूर्णत: इस्रालयचे नियंत्रण आल्याशिवाय दहशतवाद थांबणार नाही. गाझा पट्टीचा ताबा घेऊनच तेथील दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करता येईल, अशा निर्णयापर्यंत इस्रायलचे सेना नेतृत्व आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

पुरवठा रोखला

इस्रायलने गाझापट्टीचा सर्व अन्न आणि पाणीपुरवठा रोखला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्यावरच आता पॅलेस्टाईनी नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. गाझापट्टीत आता औषधांचा साठाही संपत आला आहे. नव्या इंधन पुरवठ्यातही अडथळे निर्माण झाल्याने गाझा पट्टीतील अनेक विभागांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. याचा परिणाम सार्वजनिक आस्थापने, कार्यालये आणि रुग्णालये तसेच शैक्षणिक संस्थांच्या कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे.

1 लाखाहून अधिक ठार

7 ऑक्टोबर 2023 च्या रात्री हमासच्या अनेक दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये शिरुन तेथे धुमाकूळ घातला होता. 1 हजार 200 हून अधिक ज्यूंची त्यांनी हत्या केली होती. तसेच 250 हून अधिक ज्यूंचे अपहरण केले होते. त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्रायलने चढविलेल्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोक ठार झाले आहे. इस्रायलने लेबेनॉन आणि सीरीयावरही हल्ले चढविले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचा विरोध

संपूर्ण गाझापट्टी आपल्या ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या योजनेला संयुक्त राष्ट्रसंघाने विरोध केला आहे. अशा प्रयत्नांमध्ये संघ सहभागी होणार नाही. गाझा पट्टी ताब्यात घेण्याने समस्या सुटणार नाही. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.