For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिकानेरमध्ये ‘तेजस’ तैनातीची योजना

06:42 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
बिकानेरमध्ये ‘तेजस’ तैनातीची योजना
Advertisement

राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळ पहिली स्क्वॉड्रन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डिसेंबरच्या प्रारंभी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील अधिग्रहण परिषदेने (डीएसी) 2.23 लाख कोटी ऊपयांच्या संरक्षण प्रकल्पांना मंजुरी दिली होती. या प्रकल्पांतर्गत 97 हलकी लढाऊ विमाने तेजस खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. या खरेदीद्वारे भारतीय हवाई दलातील लढाऊ पथकांची कमतरता पूर्ण करण्याची योजना आहे. भारतीय हवाई दल तेजस विमानांची पहिली स्क्वॉड्रन राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळील बिकानेर येथे तैनात करणार आहे. येथील तैनातीमुळे युद्ध झाल्यास तेजस पाच मिनिटांत सीमेवर पोहोचणार असल्याने हवाई दलाला मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

बिकानेरमधील नल एअरबेसवर तेजस एमके-वन स्क्वॉड्रन तैनात केल्यानंतर मिग-21 हटवता येईल. तेजस विमानाचा पहिला ताफा फेब्रुवारी 2024 मध्ये वितरित केला जाईल. उर्वरित विमाने 2029 पर्यंत वितरित केली जातील. तेजस हे भारताने विकसित केलेले हलके आणि बहु-भूमिका असलेले लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारे विकसित केलेले हे एक आसन आणि एक जेट इंजिन असलेले बहु-भूमिका असलेले हलके लढाऊ विमान आहे. याद्वारे आगामी काळात हवाई दलाचा ताफा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने स्वदेशी एरोस्पेस क्षेत्र आणखी मजबूत होईल.

Advertisement
Tags :

.