पिसेट्री बहरीन ग्रा प्रि विजेता
वृत्तसंस्था / बहरीन
रविवारी येथे झालेल्या बहरीन ग्रा प्रि एफ-1 मोटार शर्यतीचे जेतेपद ऑस्ट्रेलियाच्या ऑस्कर पिसेट्रीने पटकाविले.या शर्यतीमध्ये मर्सिडीज चालक जॉर्ज रसेलने दुसरे स्थान तर ऑस्ट्रेलियाचा मॅक्लरेन संघातील लॅन्डो नोरीसने तिसरे स्थान मिळविले.
शनिवारी या शर्यतीच्या सराव सत्राअखेर पिसेट्रीने पोल पोझिशन मिळविले होते. सेकीरमध्ये झालेल्या या ग्रा प्रि शर्यतीत पहिल्यांदाच मॅक्लरेन संघाला आतापर्यंत 21 व्या प्रयत्नानंतर जेतेपद मिळविता आले. 15 दिवसांपूर्वी झालेल्या जपान ग्रा प्रि एफ-1 शर्यतीचे जेतेपद मिळविणारा मॅक्स व्हर्स्टेपनला बहरीन ग्रा प्रि शर्यतीमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पिसेट्रीने या शर्यतीतील शेवटच्या टप्प्यामध्ये व्हर्स्टेपन तसेच नोरीस आणि रसेलला मागे टाकले. या शयंतीमध्ये फेरारी चालक लेव्हीस हॅमिल्टनने पाचवे स्थान मिळविले.