Kolhapur : कोल्हापुरात ट्रॉली अपघातामुळे पाइपलाईन व्हॉल्व तुटला; लाखो लिटर पाणी वाया
ई-वॉर्डातील Water Supply आठ तास बंद
कोल्हापूर : तोरस्कर चौक येथे शुक्रवारी मध्यरात्री उसाने भरलेली ट्रॉली थेट पाईपलाईन याजनेतून काळम्मावाडी येथून ई-वॉर्डात पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्ववर कोसळली. ट्रॉली कोसळल्याने हा व्हॉल्व पूर्णपणे तुटला व यातून पाणी गळती सुरू झाली. यामुळे ई वॉर्डातील काही भागातील पाणीपुरवठा शनिवारी विस्कळीत झाला होता.
घटनेची माहिती मिळताच, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री तीन वाजल्यापासून यातुन पाण्याची गळती सुरू होती. सकाळी ११ वाजता याची गळती सुरूच होती. गळती एवढी मोठी होती की रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. या दरम्यान व्हॉल्वमधून सलग आठ तास सुरू असलेल्या गळतीतून लाखो लिटरपाणी वाया गेले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळम्मावाडी येथून पाणीपुरवठा बंद केल्यानंतर पाणी गळती थांबवण्यात यश आले.
व्हॉल्व फुटल्याने ई-वॉर्डातील लाईन बाजार, कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शनिवारी सायंकाळी व्हॉल्वची दुरूस्ती करण्यात आली. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात होता. यातून वाया जाणारे पाणी. आल्याचे जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या ट्रॅक्टर चालकाकडून दुरूस्तीचा खर्च वसूल करण्यात आला.